परभणी : आमदार जिग्नेश मेवानी यांचे आवाहन, कॉम्रेड राजन क्षीरसागर यांना बहुमताने निवडून द्या!

Gujrat MLA Jignesh Mewani extends his support to CPI candidate for Parbhani Loksabha Constituency Rajan Kshirsagar
CPI candidate for Parbhani Loksabha Constituency Rajan Kshirsagar and Gujrat MLA Jignesh Mewani

परभणी : गुजरातचे अपक्ष आमदार, युवा नेते जिग्नेश मेवानी यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन समस्त पराभणीकरांना केले आहे.

आमदार जिग्नेश मेवानी यांनी एका व्हिडीओ मार्फत आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. ‘कॉम्रेड राजन यांनी आपले अवघे आयुष्य शेतकरी, कामगार, कष्टकरी जनतेसाठी वेचले आहे. शेतकरी वर्गासाठी रिलायन्स सारख्या बलाढ्य शक्तीविरोधात देखील अनेक दशके त्यांनी संघर्ष केला आहे. शेतकरी कष्टकरी जनतेच्या भल्यासाठी समाजाचे काहीतरी देने आपल्याकडे आहे व ते फेडण्यासाठी आपल्या आयुष्याची पराकाष्टा करणारे नेते आजच्या राजकीय रणधुमीत भटक्या राजकीय वाटेवर पुसट झालेले आढळतात.अश्या परिस्थितीत सामान्य जनतेचे हित जपण्यासाठी कॉम्रेड राजन सारख्या उमेदवाराला साथ देणे हे सर्व समाज प्रस्थापीठांचे आद्य कर्तव्य आहे.’परभणीतुन कॉम्रेड राजन क्षीरसागर हेच जिंकायला हवेत’ त्यातच सामान्य जनतेच्या असामान्य समस्यांचे निर्वाहन आहे असे आवाहन आमदार जिग्नेश मेवानी यांनी केले आहे.

गुजरात मधील युवा आमदार आणि दलितांवरील अत्याचाराविरुद्ध देशभरात आवाज उठवणारे जिग्नेश मेवानी यांचे परभणीतील जनतेला…

Gepostet von Rajan Kshirsagar Page am Mittwoch, 10. April 2019

कॉम्रेड राजन महाराष्ट्र राज्य किसान सभेचे उपाध्यक्ष आहेत. परभणी जिल्ह्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत आणि धडाडीने नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना संमाजसमस्याचे भान आहे व त्यांचा उलगडा करण्याकरता पुरेपूर कार्यक्षमताही.

परभणीकर लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात दि.१८ एप्रिल रोजी आपला मतदानाचा हक्क बजावतील.आपला हक्क बाजवतांना किती जबाबदारीने परभणीकर मतदान करतात हे मात्र येणारी वेळच सांगू शकेल.